Skip to main content

लिएन्डर पेस

Paes WM13-009 (9495560679).jpg१५ ग्रँड स्लॅम सविजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिसपटू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्याभारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिसपटू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठी  प्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे.

जीवनसंपादन करा

लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला.
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे.
देशभारत
वास्तव्यकोलकाता व
ओरलँडोफ्लोरिडा
जन्म१७ जून१९७३ (वय: ४४)
गोवा
उंची१.७८ मी (५)
सुरुवात१९९१
शैलीउजवा; एकहाती बॅकहॅन्ड
बक्षिस मिळकत७५,९७,५३४ डॉलर्स
प्रदर्शन९९ - ९८
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७३ (२४ ऑगस्ट १९९८)
ऑस्ट्रेलियन ओपन२ फेरी (१९९७, २०००)
फ्रेंच ओपन२ फेरी (१९९७)
विंबल्डन२ फेरी (२००१)
यू.एस. ओपन३ फेरी (१९९७)
प्रदर्शन७१४ - ३९०
अजिंक्यपदे५५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र.  (२१ जून १९९९)
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२०१२)
फ्रेंच ओपनविजयी (१९९९२००१२००९)
विंबल्डनविजयी (१९९९)
यू.एस. ओपनविजयी (२००६२००९२०१३)
अजिंक्यपदे१०
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२००३२०१०२०१५)
फ्रेंच ओपनविजयी (२०१६)
विंबल्डनविजयी (१९९९२००३२०१०२०१५)
यू.एस. ओपनविजयी (२००८२०१५)

पदक माहिती
भारत भारत साठी खेळताना
ऑलिंपिक
कांस्य१९९६ अटलांटाएकेरी
राष्ट्रकुल खेळ
कांस्य२०१० दिल्लीपुरुष दुहेरी
आशियाई खेळ
सुवर्ण१९९४ हिरोशिमापुरुष दुहेरी
सुवर्ण१९९४ हिरोशिमापुरुष संघ
सुवर्ण२००२ बुसानपुरुष दुहेरी
सुवर्ण२००६ दोहापुरुष दुहेरी
सुवर्ण२००६ दोहामिश्र दुहेरी
कांस्य१९९४ हिरोशिमापुरुष एकेरी
कांस्य२००२ बुसानमिश्र दुहेरी

संदर्भ-विकिपीडिया

Comments

Popular posts from this blog

कुसुमावती देशपांडे

समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आ. रा. देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी झाला. मधल्या काळात कुसुमावती लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून परतल्यावर त्यांचा कवी अनिलांशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात उभयतांचा झालेला पत्रव्यवहार हा त्यांच्या ‘कुसुमनिल’ या पत्रसंग्रहात समाविष्ट आहे. प्रथम नागपूर येथील महाविद्यालयात कुसुमावती इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले. कथालेखनापासून कुसुमावतींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात त्यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. नवकथापूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणार्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘...

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...