Skip to main content

सर चंद्रशेखर वेंकट रमण



चंद्रशेखर वेंकट रामन्(नोव्हेंबर ७१८८८-नोव्हेंबर २११९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचेप्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चेभौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.

सन्मान:-

चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.[१]
सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
1. Aditya ashutosh Joshi (वैद्यकीय तंत्रज्ञान) <br 2. Dhruvin vyas 3. Gopal gadhvi ४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन) ॑॑

Comments

Popular posts from this blog

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

पु.ल. देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे  ( नोव्हेंबर ८ ,  इ.स. १९१९  -  जून १२ ,  इ.स. २००० ) हे लोकप्रिय  मराठी   लेखक ,  नाटककार ,  नट , कथा व  पटकथाकार ,  दिग्दर्शक  आणि  संगीत दिग्दर्शक  होते. त्यांना  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व  असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने  पु. ल.  म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ  ऋग्वेदी  हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत. जीवन गावदेवी, मुंबईत जन्मलेले पु ल. ऊर्फ भाई, पुण्याच्या  फर्ग्युसन महाविद्यालयात  आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली  सुनीताबाईंशी  विवाहबद्ध झाले. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी...

कुसुमावती देशपांडे

समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आ. रा. देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी झाला. मधल्या काळात कुसुमावती लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून परतल्यावर त्यांचा कवी अनिलांशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात उभयतांचा झालेला पत्रव्यवहार हा त्यांच्या ‘कुसुमनिल’ या पत्रसंग्रहात समाविष्ट आहे. प्रथम नागपूर येथील महाविद्यालयात कुसुमावती इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले. कथालेखनापासून कुसुमावतींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात त्यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. नवकथापूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणार्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘...