Skip to main content

विल्यम हर्षेल



आपल्याला खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखीचा असलेला विल्यम हर्शल आधी एक संगीतज्ज्ञ होता. संगीताचे सूर व ताल यात तो खरोखरच रमत असे की नाही कोण जाणे! पण संगीत हा हर्षलच्या पोटापाण्याचा उद्योग होता. पाश्चात्य संगीताच्या वाद्यवृंदात हर्शल ऑर्गन वाजवायचा किंवा क्वचित कधी अशा वाद्यवृंदाचे संचलनही करायचा. साधारण १७३८ सालात हर्षलच्या हातात एक पुस्तक पडले. रॉबर्ट स्मिथ या लेखकाने लिहिलेले खगोलशास्त्रावरचे पुस्तक होते ते! हे पुस्तक वाचल्यावर हर्शलचे जीवन हळूहळू बदलत गेले. संगीताकडून खगोलशास्त्राकडे त्याचा प्रवास सुरू झाला होता!
एकदा हर्शलनी एका पुस्तकात आरसे वापरून केलेल्या दुर्बिणीबद्दल वाचले. या पुस्तकात दुर्बिणींसाठी आरसा तयार करण्याची कृतीसुद्धा दिली होती. एकूण खर्चाचा अंदाज घेतल्यावर असली दुर्बीण कमी खर्चात करणे शक्य आहे हे हर्शलच्या लक्षात आले. तांबे, कथिल, नंतर आरसा घासण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याच्या विचारात हर्शल असतानाच त्याला एक आनंदाची बातमी मिळाली. हर्शलच्याच एका शेजाऱ्याने पूर्वी कधीकाळी असलीच दुर्बीण बनवायचा (अयशस्वी!) प्रयत्न होता व त्याच्या घरी दुर्बीण बनवायचे सर्व सामान पडून होते. त्या शेजाऱ्यानी अगदी थोडक्या किंमतीत सर्व ‘कचरा’ हर्शलला घरी नेऊ दिला आणि हर्शलचे काम सुरू झाले!



दोनशे अयशस्वी प्रयत्नांनंतर दुर्बिणीसाठी लागणारा हर्शलचा पहिला चांगला आरसा तयार झाला. आरसे घासताना हर्शलला त्याची बहीण कॅरोलिन हिची फार मदत होत असे. प्रत्यक्ष खगोल निरीक्षणही कॅरोलिनने पुढे केले. तब्बल आठ धुमकेतू तिने शोधून काढले आहेत! कॅरोलिन ही जगातील पहिली महिला खगोलशास्त्रज्ञ होती. कमालीच्या चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे हर्शलला आरसे बनवण्याचे तंत्र इतके उत्तम साधले की त्याच्या दुर्बिणी अगदी ग्रीनिच वेधशाळेजवळच्या दुर्बिणींपेक्षाही उत्कृष्ट समजल्या जात! उत्तम दर्जाच्या दुर्बिणी म्हणून लोक हर्शलनी बनविलेल्या दुर्बिणी विकत घेत व त्यामुळे हर्शलला बऱ्यापैकी आर्थिक प्राप्तीही होऊ लागली!

, शुक्र, मंगळ, गुरु, शनी हे पाच ग्रह इतके ठळक देसतात की ते कोणालाही ‘शोधावे’ लागले नाहीत. जगातील प्रत्येक मानवी संस्कृतीत अगदी अनादी काळापासूनच ते ठाऊक होते. मानवी प्रयत्नांनी शोधला गेलेला युरेनस हा पहिलाच ग्रह आहे. या शोधापूर्वी शनी हा सर्वात दूरचा ग्रह मानवाला ठाऊक होता आणि युरेनसच्या शोधामुळे आपल्याला ज्ञात असलेल्या सूर्यमालेचा व्यास एकदम दुप्पट झाला;कारण युरेनस शनीहून दुप्पट अंतरावर आहे!
युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. हर्शलला युरेनस तसा अगदी ‘अचानक’ सापडला. १७८१ सालच्या तेरा मार्चच्या थंड रात्री आपल्या दुर्बिणीतून आकाश धुंडाळताना हर्शलला वृषभ राशीत एक नवाच ‘तारा’ दिसला. खुद्द हर्शेलला हा ग्रह चकतीसारखा दिसला होता; पण त्या वेळी त्याला वाटलं, की हा एक धूमकेतू आहे. पुढं त्या चकतीची कक्षा तपासून पाहिल्यावर दिसलं, की ही कक्षा धूमकेतूची नसून ग्रहाची आहे. वास्तविक, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार, या सर्व कक्षा लंबगोलाकार असतात; पण धूमकेतूची कक्षा लांबट आकाराची, तर ग्रहाची जवळजवळ वर्तुळाकार असते. आपल्या या नव्या ग्रहाचे नामकरण हर्शलनी ‘जॉर्जियन सायडस’ असे त्यावेळचा तिसरा जॉर्ज या इंग्लंडच्या राजाच्या नावावरून केले. मात्र हे नाव वैज्ञानिक जगात अजिबात मान्य झाले नाही! जोहान बोडनी सुचवलेले ‘युरेनस’ हेच नाव लोकप्रिय झाले.




Comments

Popular posts from this blog

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

पु.ल. देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे  ( नोव्हेंबर ८ ,  इ.स. १९१९  -  जून १२ ,  इ.स. २००० ) हे लोकप्रिय  मराठी   लेखक ,  नाटककार ,  नट , कथा व  पटकथाकार ,  दिग्दर्शक  आणि  संगीत दिग्दर्शक  होते. त्यांना  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व  असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने  पु. ल.  म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ  ऋग्वेदी  हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत. जीवन गावदेवी, मुंबईत जन्मलेले पु ल. ऊर्फ भाई, पुण्याच्या  फर्ग्युसन महाविद्यालयात  आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली  सुनीताबाईंशी  विवाहबद्ध झाले. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी...

कुसुमावती देशपांडे

समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आ. रा. देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी झाला. मधल्या काळात कुसुमावती लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून परतल्यावर त्यांचा कवी अनिलांशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात उभयतांचा झालेला पत्रव्यवहार हा त्यांच्या ‘कुसुमनिल’ या पत्रसंग्रहात समाविष्ट आहे. प्रथम नागपूर येथील महाविद्यालयात कुसुमावती इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले. कथालेखनापासून कुसुमावतींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात त्यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. नवकथापूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणार्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘...