Skip to main content

Posts

Showing posts from 2018

पाठ टाचण मध्ये दहा ते अकरा तासिका दिसत असले बाबत

पाठ टाचण मध्ये दहा ते अकरा तासिका दिसत असले बाबत मागील काही दिवसांमध्ये पाठ टाचण या एप्लीकेशन मध्ये रोज दहा ते अकरा तासिका दिसत असल्याबाबत लोकांच्या सूचना येत आहेत त्याचे कारण असे की बऱ्याच शिक्षक बांधवांच्या मागणीवरून आम्ही एप्लिकेशन मध्ये सेमी इंग्लिश माध्यमाच्या गणित आणि विज्ञान या पाठ टाचण नोंदींचा समावेश केला आहे पण त्या स्वतंत्र न दिसता आहे त्या आहे त्या ॲपमध्ये दिसत असल्यामुळे आठ तासिका ऐवजी तुम्हाला सध्या सेमी व मराठी माध्यम मिळून दहा ते अकरा तासिका दिसताहेत लवकरच अप्लिकेशन मध्ये मध्ये अपडेट करून सेमी व मराठी माध्यमाचे पाठ टाचण वेगवेगळे दिसण्याची सोय केली जाईल.

नेहमीप्रमाणे अँप चालू ,आजचे टाचण पहा.

आज नेहमीप्रमाणे टाचण अँप ओपन होईल पण 28 जून नंतर आपण अँप अपडेट केले नसल्यास आपल्याला नवीन फिचर मिळवण्यासाठी अँप  अपडेट करणे गरजेचे आहे अँप अपडेट करण्यासाठी खालील निळ्या लिंकला टच करा. https://goo.gl/HbXXh4

आजपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रम अध्यापनास सुरुवात

सर्वाना कळवण्यात येते की पाठ टाचण अँप मध्ये कालपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रम अध्यापनास सुरुवात झाली असून आजपासून पाठयपुस्तक घटक शिकवनेस सुरुवात केली आहे, तसेच प्रायोगिक तत्वावर 1 ली ते 5 वी पर्यंतचे सेमी चे इंग्लिश टाचण दिले आहे.

टाचण अँप UPDATE संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण सूचना.

आपण जर 28 जून रोजी पाठ टाचण अँप मध्ये केलेला अपडेट जर अद्याप केला नसेल तर दिनांक -06/07/2018 चे टाचण आपणांस दिसणार नसून त्यादिवशी ज्या लोकांनी अँप अपडेट केलेले नाही त्यांचे अँप या दिवशी क्रॅश होणार आहे म्हणजे ओपन होणार नाही,तसेच आपण  पाठ टाचण अँप 28 जून नंतर डाउनलोड/अपडेट केले असेल तर ते तुम्हाला अपडेट करण्याची आवश्यकता नाही. सदर अँप अपडेट केल्यानंतर  तुम्हाला  रोजचे पाठ टाचण आणि त्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व माहिती मिळणार आहे. आपण 15 जून पासून हे अँप सातत्याने वापरत आहात, यामध्ये आम्ही आपल्याला पाठ टाचण आणि त्याबरोबर खूप खूप चांगली फिचर देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन 23000 शिक्षक बांधवांनी या अँप ला भरभरून दाद दिलेली आहे त्यामुळे आम्ही या अँप ला अपडेट करून या त्याला अधिक स्मार्ट बनवण्याचा निर्णय घेतला आता अँप द्वारे फक्त पाठ टाचण न देता त्यात याबरोबरच   इतर शैक्षणिक माहिती-प्रशासकीय माहिती शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत GR पूरक शैक्षणिक साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयावर माहिती देणार आहोत, त्यासाठ...

नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध झालेबाबत...

इयत्ता 1 ली व 8वी चा अभ्यासक्रम बदलेला आहे आणि त्याची नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके ebalbharati book cart ya साईट वर उपलब्ध झाली असून ती या अक्षरांना टच करून डाउनलोड करू शकता.

नवीन परिपत्रका प्रमाणे वेळापत्रक

विद्या प्राधिकरण पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे श्री पंकज रासकर सर जि.प.शिक्षक सातारा तालुका खंडाळा  यांनी वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी     डाउनलोड ला टच करा.

पाठ टाचण app मधील सराव व उजळणी या घटकाबाबत

  आपल्या नव्या शैक्षणीक सत्राची सुरुवात   दिनांक १५ जून २०१८  व विदर्भामध्ये २६ जून २०१८ पासून  झालेली आहे, तरी काही युजर कडून आम्हाला रोजच्या दैनिक टाचणमध्ये फक्त सराव उजळणी हे घटक येत आहेत अश्या प्रतिक्रिया येत आहेत तरी  सर्व युजरना हे कळवू इच्छितो कि वार्षिक नियोजन प्रमाणे जून हा ह्या महिन्यात सर्व विषयांसाठी सराव, वर्गपूर्व तयारी हा घटक अंतर्भूत आहे त्याला अनुसरूनच आत्ता टाचण मध्ये दिनांक १५/२६ जून ते ३० जून पर्यंत सराव व उजळणी हा घटक चालू राहणार असून, जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष विषयाचा अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात होईल... 

सामाजिक समतेसाठी अविरतपणे झटणारे आज राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती.

  राजर्षी छत्रपती शाहू महाराज , ( जून २६ ,  इ.स. १८७४  -  मे ६ ,  इ.स. १९२२ ) हे  कोल्हापूर  राज्याचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज प्रभावी समाजसुधारक होते. शाहु महाराज सुधारणावादी होते . जीवन राजर्षी शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म  जून २६ ,  इ.स. १८७४  रोजी  कागल  येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च,  इ.स. १८८४  रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.  एप्रिल २ ,  इ.स. १८९४  रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे  मे ६ ,  इ.स. १९२२  रोजी त्यांचे निधन झाले. . जन्मदिवस शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला ...

सुधारित वेळापत्रक प्रमाणे दैनिक पाठ टाचण मध्ये बदल केलेबाबत.

सर्व शिक्षक बांधवाना कळविणेत येते की  दिनांक 05/10/2017 च्या महाराष्ट्र राज्य प्राधिकरण विद्या परिषद पुणे यांच्या परिपत्रकाप्रमाणे दैनंदिन वेळापत्रकात बदल करून पूर्वी साप्ताहिक ज्या  45 तासिका होत्या त्याऐवजी आता त्या 48 तासिका करण्यात आलेल्या आहेत, तसेच हा बदल सोमवार ते गुरुवार 8 तासिका                         शुक्रवार 9 तासिका आणि शनिवार 7 तासिका असा केला आहे, पाठ टाचण अँप मध्ये आता वरील बाबींचा विचार करून दिनांक 25/06/2018 पासून हे बदल केले असून आता आपल्याला नवीन वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे अचूक व दर्जेदार टाचण मिळणार आहे, तसेच अजूनही काही इयत्ताचे काही दिवसाचे तास कमी जास्त होऊ शकतात असे झाल्यास प्रत्यक्ष फोन करून किंवा whatsapp वरून ह्या त्रुटी लक्षात आणून दिल्यास त्यात बदल करता येईल.तरी हा बदल लक्षात इतर अँप युजर च्या ही लक्षात आणून द्यावा. (सदर अँप आपणांस उपयुक्त वाटत असेल तर ते जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना शेअर करावे)

पाठ टाचण अँप ची यशोगाथा...

मित्रानो कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की फक्त  4 दिवसांतच आणि आपण दिलेल्या प्रेमामुळे दैनिक पाठ टाचण* ह्या  app ला जवळपास 12000 शिक्षक बांधवांनी पसंती दिली.  तसेच 350 रिव्हेव्ह व रेटिंग्ज दिलीत, एखाद्या अँप ला आणि तेही शैक्षणिक अँप ला चार दिवसात  12000 डाउनलोड मिळणे  (तेही whatsapp वरूनच्या रंगरंगोटी केलेल्या भपकेबाज पोस्टचा सतत मारा न करता)ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नव्हे, ह्या अँप मध्ये आम्ही पाठ टाचण ह्या अँप ला आवश्यक असणारी सर्व सुपरफिचर दिली आहेत.  हे सर्व आपल्या सहकार्याने प्रेमामुळे शक्य झाले त्यामुळे आपला खूप खूप आभारी आहे. श्री सागर पतंगे जि प शाळा काळडोहवस्ती(मणेरजुरी) ता-तासगाव जि-सांगली Whatsapp no-8623864952
*महत्वपूर्ण विडिओ* https://youtu.be/tgTpPi2S1DA दैनिक पाठ टाचण ह्या अँप ला आपल्यापैकी बऱ्याच शिक्षक बांधवांनी खूपच उत्तम प्रतिसाद देऊन त्याबद्दल फक्त *चारच * दिवसांमध्ये  250 हुन अधिक *रिवेव व रेटिंग* तसेच whatsapp च्या माध्यमातून बऱ्याच सूचना प्राप्त झाल्यात त्यावरून असे लक्षात येत आहे की * युजर ना हवी असणारी सर्व फिचर ही पाठ टाचण ह्या अँप मध्ये असूनसुद्धा ती माहीत नसल्यामुळे  युजर ती वापरू शकत नाही,जसे- *1.मागील व पुढील दिवसांचे टाचण कसे पहावे?* *2.विषयशिक्षकांच्या विषयांचे टाचण कसे पहावे?* *3.टाचणा चे pdf कसे तयार करावे व ते फाईल मॅनेजर मध्ये कोठे पहावे?* ही सर्व फिचर आपण * कशी वापरायची हे दाखवण्यासाठी एक सोप्पे आणि सुटसुटीत विडिओ ट्युटोरिअल तयार केले आहे* जे पाहून तुम्ही ही सर्व *सुपरफिचर वापरू शकाल.* यासंबंधीत विडिओ पाहण्यासाठी वरील किंवा खालील युट्युब लिंकला टच करा. (हा व्हिडिओ तसेच आपले सुपर अँप दैनिक पाठ टाचण इतर शिक्षक बांधवाना शेअर करण्यास विसरू नका.) https://youtu.be/tgTpPi2S1DA

जोसेफ मॅझिनी यांचा आज जन्मदिन

मॅझिनी , जोसेफ : (२२ जून १८०५ –१० मार्च १८७२). एक इटालियन देशभक्त, लेखक आणि लोकशाही राष्ट्रवादाचा व मानवी मूलभूत मूल्यांचा प्रवक्ता. राष्ट्रवादाकरिता जीवनभर लढणारा व एकोणिसाव्या शतकातील यूरोपला क्रांतिकारक प्रेरणा देणारा महान क्रांतिकारक म्हणून यूरोपच्या इतिहासात त्याला अविस्मरणीय स्थान प्राप्त झाले आहे. ज न्म इटलीतील जेनोआ (पीडमाँट) येथे. जोसेफचे वडील वैद्यकी व अध्यापनाचा व्यवसायही करीत. बालवयात जोसेफला वाचनाचा छंद लागला. प्रकृतीची साथ नसतानाही त्याने जेनोआ विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली (१८२७) आणि वकिली व्यावसायात पदार्पण केले. विद्यार्थिदशेत वृत्तपत्रांतून तो निबंध व पुस्तकपरीक्षणे लिहीत असे. इटलीला ऑस्ट्रियन साम्राज्यशाहीतून मुक्त करण्याकरिता १८३० च्या सुमारास कार्बोनारी या गुप्तसंघटनेत तो सामील झाला. राजद्रोही म्हणून त्यास साव्होना तुरुंगात काही महिने डांबण्यात आले ; तथापि पुराव्याअभावी त्याची सशर्त सुटका करण्यात आली (१८३१). मॅझिनीचे उर्वरित बहुतेक आयुष्य हद्दपारीत फ्रान्स, स्वित्झर्लंड, इंग्लंड आदी देशांत गेले आणि  तेथूनच त्याने इटलीच्या स्वातंत्र्यलढ्यास स...

आंतरराष्ट्रीय योग दिन

आज दिनांक 21 जून 2018 आंतरराष्ट्रीय योग्य दिन त्यानिमित्ताने सर्व शिक्षक बांधवाना शुभेच्छा. दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत यासाठी प्रस्ताव मांडला होता.संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका,इंग्लंड,चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. दोन वर्षांत या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. १८ जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योग सेशन झाले.स्वत: अबॉट यांनी यावेळी योगासने केली. आता आपण योगा विषयी थोडक्यात माहिती घेऊया. य...