Skip to main content

यामिनी कृष्णमूर्ति


 (२० डिसेंबर १९४० – ). प्रख्यात भारतीय नर्तकी. जन्म मद्रास येथे. अड्यार येथील ‘कलाक्षेत्र’ह्या संस्थेची भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीतील पदविका (१९५५). नृत्याच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. भरतनाट्यम्‌चे शिक्षण त्यांनी एल्लप्पा पिळ्ळै ह्यांच्याकडे घेतले. तसेच वेदांतम्‌ लक्ष्मीनारायण शास्त्री व वेणुगोपाल कृष्ण शर्मा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कूचिपूडी नृत्याचे आणि पंकज चरण दास ह्यांच्याकडे ओडिसी नृत्याचे शिक्षण घेतले. दिल्ली येथे त्यांनी ‘कौस्तुभ’ ह्या नृत्यशाळेची १९५९ मध्ये स्थापना केली.‘संगीत भारती’ ह्या संस्थेत त्यांनी भरतनाट्यम्‌चे अध्यापन केले. तसेच विविध नृत्यप्रयोगही वेळोवेळी सादर केले. भरतनाट्यम्‌कूचिपूडी व ओडिसी ह्या नृत्यप्रकारांमध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व दिसून येते. क्षीरसागर मंथनम्‌ ह्या कूचिपूडी नृत्य नाट्यात त्यांनी विश्वमोहिनीची प्रमुख भूमिका केली व त्या भूमिकेद्वारे कूचिपूडी नृत्यनाट्यातील पहिली नर्तकी असा लौकिक मिळवला. तोपर्यंत ह्या पारंपारिक नृत्यात फक्त पुरुषच भाग घेत असत. त्यांच्या नृत्याविष्कारातून भावनावेगगतीलयचैतन्य व मोहकता ह्यांचा मनोज्ञ प्रत्यय येतो. १९६५ च्या राष्ट्रकुल कला-समारोहात त्यांनी नृत्य सादर केले होते. १९६७ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब मिळाला. भारतातील प्रमुख शहरांत तसेच ब्रह्मदेशनेपाळ आणि ऑस्ट्रेलिया येथेही त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

कुसुमावती देशपांडे

समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आ. रा. देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी झाला. मधल्या काळात कुसुमावती लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून परतल्यावर त्यांचा कवी अनिलांशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात उभयतांचा झालेला पत्रव्यवहार हा त्यांच्या ‘कुसुमनिल’ या पत्रसंग्रहात समाविष्ट आहे. प्रथम नागपूर येथील महाविद्यालयात कुसुमावती इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले. कथालेखनापासून कुसुमावतींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात त्यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. नवकथापूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणार्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘...