Skip to main content

जागतिक मानसिक आरोग्य दिन

10 ऑक्टोबर ही तारीख जगात जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. 
या दिनाची पार्श्वभूमी
जागतिक मानसिक आरोग्य दिन (10 ऑक्टोबर) हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य प्रशिक्षण, जागरूकता आणि पुरस्कर्ता यासाठी आहे. हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य फेडरेशन (World Federation for Mental Health) यांच्या पुढाकाराने सन 1992 मध्ये प्रथम साजरा करण्यात आला. WFMH ही एक जागतिक मानसिक आरोग्य संस्था आहे आणि याचे सदस्य आणि संपर्क 150 हून अधिक देशांमध्ये आहेत.

मानसिक आरोग्याबाबत जागतिक परिस्थिति आणि त्यामध्ये भारत
मानसिक आरोग्य विकार हा जगभरात आढळणारा सामान्य विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे. भारतात हीच संख्या एकूण 1.5 दशलक्ष आहे, यामध्ये मुले आणि पौगंडावस्थेतील समस्या यांच्या समावेशासह विविध मानसिक आरोग्य समस्यांचा समावेश होतो.
मानसिक विकारामध्ये, व्यक्तीच्या आजूबाजूला आढळणार्‍या परिस्थिति आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ति आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकली नाही त्यावेळी अश्या विकारांचा जन्म होतो. यामधून त्या व्यक्तीमध्ये असामान्य वर्तन तयार होते.
या गंभीर परिस्थितीला ओळखता, भारत सरकारने सन 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) सुरू केले होते. आजही भारतामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती नाही आणि त्या अभावी भविष्यात याचा उद्रेक होण्याचे संकेत निर्माण झाले आहे. जनसामान्यांना हे समाजाने अत्यावश्यक झाले आहे की, हा आजार नसून ही एक परिस्थिति आहे.  
मानसिक आजाराची मूळ कारणे
मानसिक आरोग्य समस्येला कारणीभूत ठरणारी विविध कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • कुटुंबातील चिंता, एकाकीपणा, मित्रांकडून दबाव, कमी प्रतिष्ठा, मृत्यू किंवा घटस्फोट यामधून निर्माण होणारा ताण.
  • अपघात, दुखापती, हिंसा, बलात्कार झाल्याने होणारा मानसिक आघात
  • अनुवांशिक विकृती
  • मेंदूला दुखापत / दोष
  • मद्य आणि अमली पदार्थ च्या आहारी गेल्यामुळे.
  • मेंदूला नुकसान पोहचल्यास होणारे संक्रमण

Comments

Popular posts from this blog

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

सामाजिक समतेसाठी अविरतपणे झटणारे आज राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती.

  राजर्षी छत्रपती शाहू महाराज , ( जून २६ ,  इ.स. १८७४  -  मे ६ ,  इ.स. १९२२ ) हे  कोल्हापूर  राज्याचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज प्रभावी समाजसुधारक होते. शाहु महाराज सुधारणावादी होते . जीवन राजर्षी शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म  जून २६ ,  इ.स. १८७४  रोजी  कागल  येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च,  इ.स. १८८४  रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.  एप्रिल २ ,  इ.स. १८९४  रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे  मे ६ ,  इ.स. १९२२  रोजी त्यांचे निधन झाले. . जन्मदिवस शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला ...