आपण जर 28 जून रोजी पाठ टाचण अँप मध्ये केलेला अपडेट जर अद्याप केला नसेल तर दिनांक -06/07/2018 चे टाचण आपणांस दिसणार नसून त्यादिवशी ज्या लोकांनी अँप अपडेट केलेले नाही त्यांचे अँप या दिवशी क्रॅश होणार आहे म्हणजे ओपन होणार नाही,तसेच आपण पाठ टाचण अँप 28 जून नंतर डाउनलोड/अपडेट केले असेल तर ते तुम्हाला अपडेट करण्याची आवश्यकता नाही. सदर अँप अपडेट केल्यानंतर तुम्हाला रोजचे पाठ टाचण आणि त्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व माहिती मिळणार आहे. आपण 15 जून पासून हे अँप सातत्याने वापरत आहात, यामध्ये आम्ही आपल्याला पाठ टाचण आणि त्याबरोबर खूप खूप चांगली फिचर देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन 23000 शिक्षक बांधवांनी या अँप ला भरभरून दाद दिलेली आहे त्यामुळे आम्ही या अँप ला अपडेट करून या त्याला अधिक स्मार्ट बनवण्याचा निर्णय घेतला आता अँप द्वारे फक्त पाठ टाचण न देता त्यात याबरोबरच इतर शैक्षणिक माहिती-प्रशासकीय माहिती शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत GR पूरक शैक्षणिक साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयावर माहिती देणार आहोत, त्यासाठ...
पाठ टाचण मध्ये दहा ते अकरा तासिका दिसत असले बाबत मागील काही दिवसांमध्ये पाठ टाचण या एप्लीकेशन मध्ये रोज दहा ते अकरा तासिका दिसत असल्याबाबत लोकांच्या सूचना येत आहेत त्याचे कारण असे की बऱ्याच शिक्षक बांधवांच्या मागणीवरून आम्ही एप्लिकेशन मध्ये सेमी इंग्लिश माध्यमाच्या गणित आणि विज्ञान या पाठ टाचण नोंदींचा समावेश केला आहे पण त्या स्वतंत्र न दिसता आहे त्या आहे त्या ॲपमध्ये दिसत असल्यामुळे आठ तासिका ऐवजी तुम्हाला सध्या सेमी व मराठी माध्यम मिळून दहा ते अकरा तासिका दिसताहेत लवकरच अप्लिकेशन मध्ये मध्ये अपडेट करून सेमी व मराठी माध्यमाचे पाठ टाचण वेगवेगळे दिसण्याची सोय केली जाईल.